AIIMS CRE Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1400+ जागांसाठी मेगा भरती

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) अंतर्गत Common Recruitment Examination (CRE) 2026 अंतर्गत विविध गट-B आणि गट-C पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये देशभरातील विविध AIIMS संस्था आणि संबंधित आरोग्य संस्थांमध्ये पदे भरली जाणार आहेत. उपलब्ध माहितीनुसार सुमारे 1400+ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

वैद्यकीय, तांत्रिक, प्रशासकीय आणि इतर विविध विभागांमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे.

भरतीचा तपशील:

भरती संस्था : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)

परीक्षेचे नाव: Common Recruitment Examination (CRE-5) 2026

पद प्रकार: गट-B आणि गट-C (नॉन-फॅकल्टी)

एकूण जागा: 1400+ जागा

पदाचे नाव & तपशील:

अ. क्र.पदाचा प्रकार व नावेएकूण रिक्त जागा
1ग्रुप B आणि ग्रुप C कॅटेगरी
यामध्ये असिस्टंट डायटिशियन, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक, निम्न श्रेणी लिपिक, सहाय्यक अभियंता तसेच इतर समकक्ष पदांचा समावेश आहे.
1400+
एकूण पदे1400 पेक्षा जास्त

टीप : अधिकृत जाहिरात आल्यावर प्रत्येक पदाच्या नेमक्या जागा कळतील. सध्या 1400+ ही एकत्रित संख्या आहे.

शैक्षणिक पात्रता :

  1. किमान 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  2. ITI ट्रेड सर्टिफिकेट धारकांना काही तांत्रिक पदांसाठी संधी आहे.
  3. कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजेच B.A, B.Com, B.Sc पदवी असणारे पात्र आहेत.
  4. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार जसे M.A, M.Com, M.Sc, MSW यांना वरिष्ठ पदांसाठी प्राधान्य मिळेल.
  5. विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी B.Sc, M.Sc असलेल्या उमेदवारांसाठी लॅब टेक्निशियन व इतर पदे उपलब्ध आहेत.
  6. अभियांत्रिकी पदवी B.E / B.Tech उत्तीर्ण असलेले उमेदवार असिस्टंट इंजिनिअर पदासाठी अर्ज करू शकतात.

महत्वाची टीप: पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात, त्या पदासाठीची नेमकी पात्रता अधिकृत जाहिरातीमध्ये एकदा नक्की तपासा.

अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:

तपशीलमाहिती
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज शुल्कसर्वसाधारण व ओबीसी प्रवर्ग / ₹3000/-
एससी, एसटी व ईडब्ल्यूएस प्रवर्ग / ₹2400/-
दिव्यांग (PWD) उमेदवारशुल्क माफ / – ₹0/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

वयोमर्यादा :

AIIMS CRE 2026 भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 03 जुलै 2026 या तारखेला ग्राह्य धरली जाणार आहे. या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. काही पदांसाठी कमाल वय 25 वर्षे, काहींसाठी 27 वर्षे, तर काही पदांसाठी 30, 35, 40 व 45 वर्षांपर्यंत वयाची अट आहे.

वयामध्ये मिळणारी सूट:
सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना वयात 5 वर्षांची सवलत मिळेल. तर इतर मागासवर्गीय OBC उमेदवारांसाठी ही सवलत 3 वर्षांची असेल. दिव्यांग, माजी सैनिक आणि AIIMS च्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेत अतिरिक्त सूट लागू आहे, ज्याची सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली जाईल.

महत्वाचे: तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात, त्या पदाची नेमकी वयोमर्यादा किती आहे हे एकदा मूळ जाहिरातीमध्ये नक्की तपासून घ्या. 03 जुलै 2026 रोजी तुमचे वय मोजले जाईल.

महत्वाच्या तारखा :

EVENTDate
अर्ज करण्याची अंतिम तारीख03 जुलै 2026
CBT परीक्षेच्या तारखा25, ते 27 जुलै 2026

आवश्यक कागदपत्रे :

अर्ज करताना खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  1. आधार कार्ड
  2. फोटो व स्वाक्षरी
  3. शैक्षणिक प्रमाणपत्रे
  4. जातीचा दाखला (लागू असल्यास)
  5. अनुभव प्रमाणपत्र
  6. मोबाईल नंबर व ईमेल आयडी

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत AIIMS परीक्षा पोर्टलला भेट द्या.
  2. नवीन नोंदणी करा.
  3. वैयक्तिक माहिती भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  6. अर्जाची प्रत सेव्ह करून ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स:

लिंकचे नावलिंक
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

AIIMS CRE Bharti 2026 – Frequently Asked Questions (FAQ)

Q1. भरतीचे नाव काय आहे?
Ans: या भरतीचे नाव AIIMS Common Recruitment Examination (CRE-5) 2026 आहे.

Q2. एकूण किती जागा उपलब्ध आहेत?
Ans: या भरतीमध्ये 1400+ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

Q3. कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे?
Ans: Group B आणि Group C अंतर्गत विविध पदांसाठी भरती होणार आहे जसे Assistant Dietician, Assistant Admin Officer, Data Entry Operator इ.

Q4. अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
Ans: उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Q5. अर्ज कोण करू शकतो?
Ans: संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

Q6. निवड प्रक्रिया कशी असेल?
Ans: निवड Computer Based Test (CBT) आणि इतर आवश्यक टप्प्यांनुसार केली जाईल.

Q7. ही भरती कोण आयोजित करते?
Ans: ही भरती AIIMS (All India Institute of Medical Sciences) द्वारे आयोजित केली जाते.

Q8. ही भरती कोणत्या गटासाठी आहे?
Ans: ही भरती Group B आणि Group C पदांसाठी आहे.

Q9. अर्ज करण्यापूर्वी काय तपासावे?
Ans: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात, पात्रता, वयोमर्यादा आणि आवश्यक कागदपत्रे तपासावीत.

Q10. AIIMS CRE भरतीमध्ये किती प्रकारची पदे आहेत?
Ans: या भरतीमध्ये अनेक विभागांतील विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्वाची टीप: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

Leave a Comment