महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. Maharashtra Public Service Commission (MPSC) मार्फत गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत एकूण 2619 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक अशा विविध पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
भरतीचा तपशील:
भरती संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
एकूण जागा: 2619
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | विभाग | एकूण रिक्त जागा |
| 1 | उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 09 |
| 2 | तांत्रिक सहायक | वित्त विभाग | 03 |
| 3 | कर सहायक | वित्त विभाग | 282 |
| 4 | सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क | गृह विभाग | 461 |
| 5 | लिपिक-टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 1864 |
| एकूण पदे | 2619 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 – पात्रताशैक्षणिक पात्रता: खालीलपैकी कोणतीही एक अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree) तंत्रज्ञानातील पदविका (Diploma in Technology)विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc. Degree)
पद क्र. 2 – पात्रताशैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate in Any Discipline)
पद क्र. 3 – पात्रताशैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) टंकलेखन अनिवार्य:मराठी टंकलेखन: 30 शब्द प्रति मिनिटइंग्रजी टंकलेखन: 40 शब्द प्रति मिनिटदोन्ही टंकलेखन आवश्यक आहे
पद क्र. 4 – पात्रताशैक्षणिक पात्रता: इयत्ता 10वी उत्तीर्ण (SSC Pass)यापैकी कोणतेही एक: ऑटोमोबाईल / मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका (Diploma)ऑटोमोबाईल / मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी (Degree)किंवा समतुल्य पात्रता
पद क्र. 5 – पात्रताशैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate)टंकलेखन अनिवार्य:मराठी टंकलेखन: 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन: 40 शब्द प्रति मिनिटकोणतेही एक टंकलेखन चालेल
अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:
| तपशील | माहिती |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
| अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-] |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
वयोमर्यादा :
वयोमर्यादा – 01 ऑक्टोबर 2026 नुसार
सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयाची अट:-
- पद क्रमांक 1, 2, 4, 5 अर्जदाराचे वय किमान 19 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.
- पद क्रमांक 3 अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावे.
- वयातील सूट :- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, तसेच अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत लागू राहील.
- म्हणजेच वरील प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे असेल.
महत्वाच्या तारखा :
| EVENT | DATE |
| Online अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 जुलै 2026 |
| पूर्व परीक्षा (CBT) | 27 सप्टेंबर 2026 पासून |
महत्त्वाच्या लिंक्स:
| लिंकचे नाव | लिंक |
| ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |