BPCL मध्ये नोकरीची संधी 2026: 55 एक्सपर्ट पोस्ट, 20 जून आधी अर्ज करा

BPCL मध्ये करिअर करायचंय? 55 जागांसाठी भरती सुरू

भारत पेट्रोलियम (BPCL) ही भारत सरकारची महारत्न कंपनी जून 2026 मध्ये 55 नवीन अधिकाऱ्यांची भरती करत आहे. ही भरती फक्त अनुभवी लोकांसाठी आहे. जर तुमच्याकडे इंजिनिअरिंग, फायनान्स, किंवा मॅनेजमेंटचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2026 आहे.

भरतीचा तपशील:

विभागाचे नाव | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)
एकूण रिक्त पदे | 55

पदाचे नाव & तपशील:

अ.क्र.पदाचे नावपद संख्या
1टीम मेंबर/टीम लीडर – एक्सप्लोरेशन02
2टीम मेंबर/टीम लीडर – अॅसेट मॅनेजर02
3टीम मेंबर – रिझर्व्हायर इंजिनिअर01
4कंपनी सेक्रेटरी – टीम लीडर02
5कंपनी सेक्रेटरी – टीम मेंबर02
6टीम मेंबर/लीडर – फायनान्स15
7हेड सेल्स (पेट्रोकेमिकल)01
8टेक्निकल ऑफिसर – पॉलिमर02
9टीम लीड – WSA05
10साइट मॅनेजर – WSA23
एकूण55

टीप: पदांची संख्या आणि पात्रता अधिकृत अधिसूचनेनुसार आहे. अंतिम निवड BPCL च्या नियमांनुसार होईल.

शैक्षणिक पात्रता :

BPCL च्या या 55 जागांसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे खालील पात्रता आणि कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. प्रत्येक पदासाठी अट वेगळी आहे.

  1. टीम लीडर – एक्सप्लोरेशन: कोणत्याही शाखेतील B.E. किंवा B.Tech पदवी 60% गुणांसह पास असावी. SC/ST/PWD उमेदवारांना 50% गुण पुरेसे आहेत. यासोबत संबंधित क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा कामाचा अनुभव हवा.
  2. टीम लीडर – अॅसेट मॅनेजर: कोणत्याही शाखेतील B.E. किंवा B.Tech पदवी 60% गुणांसह आवश्यक. या पदासाठी किमान 7 वर्षांचा अनुभव लागेल.
  3. रिझर्व्हायर इंजिनिअर: पेट्रोलियम, पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, अप्लाइड पेट्रोलियम किंवा केमिकल शाखेतील B.E./B.Tech 60% गुणांसह उत्तीर्ण असावे. SC/ST/PWD साठी 50% गुणांची अट आहे. तसेच 7 वर्षांचा अनुभव बंधनकारक आहे.
  4. कंपनी सेक्रेटरी – टीम लीडर: उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) मधून पात्र CS असावा. यासोबत CS म्हणून 18 वर्षे काम केल्याचा दाखला लागेल.
  5. कंपनी सेक्रेटरी – टीम मेंबर: ICSI मधून पात्र कंपनी सेक्रेटरी असणे आवश्यक. या पदासाठी 7 वर्षांचा CS चा अनुभव पुरेसा आहे.
  6. फायनान्स – टीम लीडर/मेंबर: उमेदवार CA किंवा ICWA परीक्षा उत्तीर्ण असावा. फायनान्स, अकाउंट्स किंवा टॅक्सेशन क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  7. हेड सेल्स – पेट्रोकेमिकल: केमिकल, मेकॅनिकल, पॉलिमर, पेट्रोकेमिकल, प्लास्टिक इंजिनिअरिंग किंवा प्लास्टिक टेक्नॉलॉजी शाखेतील B.E./B.Tech 60% गुणांसह असावी. SC/ST/PWD साठी 50% गुण चालतील. याऐवजी PhD, M.Sc (अप्लाइड पॉलिमर सायन्स/पॉलिमर सायन्स) किंवा MBA/PGDM केलेले उमेदवारही पात्र आहेत. अनुभव 21 वर्षांचा लागेल.
  8. टेक्निकल ऑफिसर – पॉलिमर: केमिकल इंजिनिअरिंग, पॉलिमर सायन्स, पॉलिमर इंजिनिअरिंग, मटेरियल सायन्स, मटेरियल इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, प्लास्टिक इंजिनिअरिंग किंवा प्लास्टिक टेक्नॉलॉजी यापैकी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह हवी. SC/ST/PWD साठी 50% गुण आवश्यक. PhD किंवा M.Sc (अप्लाइड पॉलिमर सायन्स/पॉलिमर सायन्स) चालेल. अनुभव 4 वर्षांचा हवा.
  9. टीम लीड – WSA: बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट किंवा हॉटेल मॅनेजमेंट यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा PG डिप्लोमा असावा. सोबत 10 वर्षांचा कामाचा अनुभव लागेल.
  10. साइट मॅनेजर – WSA: 60% गुणांसह B.E./B.Tech + हॉस्पिटॅलिटी मधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आवश्यक. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन/हॉस्पिटॅलिटी मधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा चालेल. एकूण 5 वर्षांचा अनुभव हवा.

अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:

तपशीलमाहिती
नोकरीचे ठिकाणनिवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारतभरातील BPCL च्या कोणत्याही कार्यालयात किंवा प्रोजेक्ट साईटवर केली जाऊ शकते.
अर्ज शुल्कखुला/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ₹1180 शुल्क आकारले जाईल. SC/ST/PWD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. फी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल.
अर्ज करण्याची पद्धतअर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. ऑफलाईन किंवा पोस्टाने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सूचना: अर्ज फक्त bharatpetroleum.in या अधिकृत संकेतस्थळावरच सादर करावेत. इतर कोणत्याही लिंकवरून अर्ज करू नये.

वयोमर्यादा:

BPCL भरती 2026 साठी वयाची अट पदानुसार खालीलप्रमाणे निश्चित केली आहे:

वयाची गणना करण्याचा दिनांक :
उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2026 या तारखेला ग्राह्य धरले जाईल. या तारखेला उमेदवार खालील वयोमर्यादेत बसणे आवश्यक आहे.

प्रवर्गानुसार वयातील सवलत :

  1. SC/ST प्रवर्ग: कमाल वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल.
  2. OBC (NCL) प्रवर्ग: कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट मिळेल.
पदाचा प्रकारकमाल वय
टीम लीडर – एक्सप्लोरेशन, अॅसेट मॅनेजर, फायनान्स आणि हेड सेल्स50 वर्षे पूर्ण नसावी
रिझर्व्हायर इंजिनिअर, टेक्निकल ऑफिसर आणि साइट मॅनेजर34 वर्षे पूर्ण नसावी
कंपनी सेक्रेटरी – टीम लीडर46 वर्षे पूर्ण नसावी
कंपनी सेक्रेटरी – टीम मेंबर38 वर्षे पूर्ण नसावी
टीम लीड – WSA42 वर्षे पूर्ण नसावी

टीप: वयाचा पुरावा म्हणून 10वी चे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला ग्राह्य धरला जाईल.

महत्वाच्या तारखा :

EVENTDate
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 जून 2026
परीक्षेचे वेळापत्रकनंतर कळविण्यात येईल.

अर्जासंबंधी महत्त्वाची माहिती:

तपशील माहिती
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत.
अर्ज शुल्कसर्वसाधारण / ओबीसी/ EWS ₹1180/-
SC / ST / PWD / दिव्यांग शुल्क माफ आहे
अर्ज करण्याची पद्धतपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील

महत्त्वाच्या लिंक्स

लिंकचे नावलिंक
अधिकृत जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

Leave a Comment